Pages

October 27, 2012

Amravati District अमरावती जिल्हा

मुख्यालय अमरावती
क्षेत्रफळ १२,२१२ चौ.कि.मी.
लोकसंख्या २६,०६,०६३  जनगणना- २००१ नुसार
तालुके अमरावती, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड,धारणी, दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, तिवसा, भातुकली, चांदूर बाजार, चांदूर-रेल्वे, नांदगाव-खंडेश्वर 
सीमा उत्तरेस मध्य प्रदेश,दक्षिणेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमला अकोला जिल्हा आहे.
नद्या  तापी नदी उपनद्या- सिपना, कापरा, गडगा. पूर्णा नदी उपनद्या-शहानुर, चंद्रभागा,पेढी. वर्धा नदी उपनद्या- विदर्भा,चारघड , बेंबला, खोलात, चुडामण.
प्रमुख शेती उत्पादन ज्वारी, भुईमुग, तूर, विड्याची पाने, संत्री, मोसंबी, द्राक्षे, कापूस 
धरणे अप्पर वर्धा प्रकल्प (सिमोरा)
थंड हवेचे ठिकाण चिखलदरा
अधिक माहिती
संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अमरावती हि जन्म व कर्म भूमी आहे.
चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन म्हणून अमरावती मध्ये ओळखले जाते.
मोर्शी तालुक्यापासून ८ कि.मी. वर सालबर्डी येथे गरम आणि थंड असे दोन पाण्याचे झरे आहेत.
अमरावती मध्ये कुष्ठरोग्यांसाठी शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेले 'तपोवन' आहे. 

<<Back To GK


No comments:

Post a Comment