Pages

January 27, 2013

Visheshan विशेषण

             नामाबद्दल जो शब्द विशेष किंवा अधिक माहिती सांगतो आणि नामाची व्याप्ती मर्यादित करतो, अशा विकारी शब्दास "विशेषण" असे म्हणतात.
            ज्या नामाबद्दलची माहिती सांगितलेली असते, त्याला "विशेष्य " म्हणतात.

: विशेषणाचे प्रकार :

गुणविशेषण : जो शब्द नामाचा गुण किंवा विशेष दाखवितो, त्यास "गुण विशेषण" असे म्हणतात.

गुण विशेषण नेहमी त्याच्या विशेष्याच्या अगोदर येते.
उदा: सुंदर मुलगी, चतुर मुलगा

संख्या विशेषण : ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते, त्या विकारी शब्दाला "संख्या विशेषण" असे म्हणतात.

संख्या विशेषणाचे प्रकार :

१. गणनावाचक संख्या विशेषण : ज्या विशेषणाचा उपयोग गणना किंवा मोजण्यासाठी केला जातो.
उदा: दहा भाषा , चाळीस मुले

२. क्रम वाचक संख्या विशेषण: ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखविण्यासाठी केला जातो.
उदा: दुसरा बंगला, पहिले दुकान,

३. आवृत्ती वाचक संख्या विशेषण: ज्या विशेषणाचा उपयोग "किती वेळा" याचा बोध करण्यासाठी केला जातो.
उदा: दहापट रक्कम, चौपदरी घडी

४. पृथकत्ववाचक संख्या विशेषण: ज्या विशेषणाचा उपयोग वेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो.
उदा: एकेक विद्यार्थी, दहा-दहाची तुकडी


विधी विशेषण: विशेष्याच्या किंवा नामाच्या नंतर येणा-या विशेषणाला " विधी विशेषण" म्हणतात.

सार्वनामिक विशेषण: जी विशेषणे सर्नामांपासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना "सार्वनामिक विशेषण" म्हणतात.
उदा:  मी: माझा, माझी, माझे
        तू: तुझा, तुझी, तुझे


No comments:

Post a Comment