जिल्हाधिकारी कार्यालय परभणी
तलाठी पदासाठी लेखी परीक्षा २०११
वेळ : ३ ते ५
गुण: २००
१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते?
अ) पदार्थ विज्ञान ब)
राज्यशास्त्र क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र
२..................या भारतीय वेज्ञानिकाने वनस्पती संबंधी केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.
वनस्पतींनाही संवेदना असतात, असे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केले.
अ) प्रफुल्लचंद्र राय ब) सी.व्ही. रमन क)
जगदीशचंद्र बोस द) डॉ. सुब्रह्मण्यम भारती
३. रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपैकी कोणती सज्ञा आहे?
अ) एलिझा टेस्ट ब) बायोप्सी क) अन्जिओ ब्लास्ट द) वेस्टर्न ब्लॉक टेस्ट
४. धवलक्रांती जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?
अ) डॉ. एम.एस. स्वामिनाथन ब)
वर्गीस कुरियन क) डॉ. रघुनाथ माशेलकर द) डॉ. राजा रामण्णा
५. जनागणना २०११ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारतात व महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील दर हजार मुलामागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे ..............व ................आहे.
अ) ९१४ व ८८३ ब) ९२७ व ९१३ क) ९४५ व ९४६ द) यापैकी नाही
६................रोजी ग्याट चे रुपांतर जागतिक व्यापार संघटने मध्ये केले गेले.
अ) १ जानेवारी १९९४ ब) १ एप्रिल १९९४ क) १ जानेवारी १९९५ द) १ एप्रिल १९९५
७. खालीलपैकी कोणता कर एखाद्या वस्तूंची किंमत वाढण्यास प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत नाही.
अ) विक्रीकर ब) आयात कर क)
स्थानिक कर द) प्राप्तिकर
८. पंचायत समिती पातळीवर ( तालुका पातळीवर ) ग्रामीण विकास कार्याची जबाबदारी प्रमुख्याने पुढीलपैकी कोणावर असते?
अ) ग्रामसेवक ब) ग्रामविकास अधिकारी
क)
गट विकास अधिकारी द) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी
९. महाराष्ट्र ............हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे.
अ) राज्यपाल ब)
मुख्यमंत्री क) जिल्हाधिकारी द) लोकायुक्त
१०. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा ............तासांनी पुढे आहे.
अ) अडीच ब) साडेचार क)
साडेपाच द) साडेसात
११. खाली भारतातील काही राज्ये व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैके कोणती जोडी चुकीची आहे?
अ) नागालँड : कोहिमा ब) मेघालय : शिलॉंग
क) अरुणाचल प्रदेश : इटानगर द)
त्रिपुरा : इम्फाळ१२. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान...........
अ)
संपूर्णत : बरोबर आहे ब) संपूर्णत : चुकीचे आहे
क) अंशत : बरोबर आहे द) असंदिग्ध स्वरूपाचे आहे
१३. मंडोलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी.............. हा ग्रंथ लिहिला
अ) अर्कीक होम इन द वेदाज ब)
गीता रहस्य क) ओरायन द) प्रतियोगिता सहकार
१४. " जय जवान, जय किसान" हि घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती?
अ) जवाहरलाल नेहरू ब)
लालबहादूर शास्त्री क) इंदिरा गांधी द) जयप्रकाश नारायण
१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते.
ब) ते भारताच्या घटना समितीचे सचिव होते.
क) त्यांनी भारताच्या घटना समितीचा राजीनामा दिला.
द)
ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.१६. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील............या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार (VETO) वापरता येतो.
अ)
अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रांसब) अमेरिका, रशिया, तेवान, ब्रिटन व फ्रांस
क) अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन व फ्रांस
द) अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायल व ब्रिटन
१७. सन २०११ सालासाठीचा म्यागसेस पुरस्कार बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणा-या .......यांना जाहीर करण्यात आला?
अ) हरीश हांडे ब) प्रकाश आमटे क) किरण बेदी द) नीलिमा मिश्रा
१८. मुंबई क्रिकेट असोशिएशन चे अध्यक्ष ...........हे आहेत.
अ) शरद पवार ब) शशांक मनोहर क) विलासराव देशमुख द) यापैकी नाही.
१९. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री..........आहेत.
अ) फौजिया खान ब)
प्रकाश सोळंके क) राजेंद्र गावित द) वर्षा गायकवाड
२०. महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशनची व्याप्ती वाढवून नुकतेच त्यामध्ये .......जिल्हे व .....तालुक्यांचा समावेश केला आहे.
अ) २२ व १२५ ब) १२ व २५ क) सर्व जिल्हे व तालुके द) यापैकी नाही
२१. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढून........ झालेले आहे.
अ) ८२.९ % ब) ७६.९ % क) ८६.० % द) ६७ %
२२. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.
अ) खाद्य तेल ब) सिमेंट क) अन्नधान्य द) खनिज तेल
२३. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केले जाते?
अ) ग्रामसेवक ब)
तलाठी क) पोलीस पाटील द) सरपंच
२४. महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नाचे क्षेत्रनिहाय विभाजन केले असता कोणते विधान सत्य आहे?
अ) कृषी क्षेत्राचा वाटा घटला व सेवा क्षेत्राचा वाट वाढला
ब) उद्योग क्षेत्राचा वाटा घटला व कृषी क्षेत्राचा वाटा वाढला
क) सेवा क्षेत्राचा वाटा घटला व उद्योग क्षेत्राचा वाटा वाढला
द) सेवा क्षेत्राचा वाटा किंचित वाढला व उद्योग क्षेत्राचा वाटा वाढला
२५. महसुली तुट म्हणजे काय ?
अ) महसुली प्राप्ती आणि महसुली खर्चातील फरक
ब) महसुली खाते आणि भांडवली खाते यांमधील फरक
क) नियोजित आणि नियोजनेतर खर्चातील तफावत
द) मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत
२६. गटात न बसणारी संख्या कोणती?
११, १३, १५, १७
अ) ११ ब) १३ क) १५ द) १७
२७. खालील बेरजेत * या चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल?
३*४ + ८*३ + २९६ = १४*३
अ) १ ब) ० क) ५ द) २
२८. कोणत्या अंकाची अदलाबदल केली तर पुढे दिलेल्या समुहातील सर्वात लहान संख्या हि सर्वात मोठी संख्या होईल?
२६९, २४५, ३८१, ३६५, ४६८
अ) ५ आणि २ ब) ९ आणि २ क) ६ आणि २ द) ४ आणि २
२९. प्रश्न चिन्हां जागी येणारा पर्याय ओळखा
CX, DW ? FU, GT, HS
a) CV b) FV c) EF d) EV
30. ABBA, EFFE, IJJI ?
A) MNNM B) NMMN C) LMML D) MLLM
३१. पेरूला डाळिंब म्हटले, दालीम्बाला फणस म्हटले, फणसाला केळ म्हटले व केळ्याला पेरू म्हटले तर कोणत्या फळा मधून गरे मिळतील?
अ) डाळिंब ब) फणस क) केळे द) पेरू
३२. खालील शब्द कालानुक्रमे लावून त्यापैकी मधोमध येणारा शब्द कोणता?
मरण, बाल्य, जन्म , वार्धक्य , तारुण्य
अ) जन्म ब) बाल्य क) तारुण्य द) वार्धक्य
३३. एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द EXYFQ असा लिहितात, तर त्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहाल?
a) MSLOBGV b) LSBMQOV c) MLSBOQV d) MLSBQOV
३४. जर MANAGEMENT हा शब्द PQRS असा CAGE हा शब्द TQ असा आणि AGENT हा शब्द QS अस लिहिला, तर R म्हणजे..........?
a) GEM b) MEN c) EM d) ME
३५. वर्तुळ : परीघ :: चौरस : ?
अ) घनफळ ब) क्षेत्रफळ क) बाजू द) परिमिती
३६. खालीलपैकी कोणता अंक गटाबाहेरील आहे?
४८, १०४, १४४, १५८
अ) १४४ ब) ४८ क) १०४ द) १५८
३७. ६५० मधून एका संख्येची पाचपट वजा केली तर त्या संख्येच्या ८ पट एवढी बाकी राहते. तरी ती संख्या कोणती?
अ) ४० ब) ५० क) ६० द) ७०
३८. एक घड्याळ आरशातून पाहिल्यास ८ वा. १० मी. हि वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात ते घड्याळ कोणती वेळ दर्शविते आहे.
अ) ३ वा. ५० मी. ब) ४ वा. २० मी. क) ५ वा. १० मी. द) ३ वा. ३० मी.
३९. पुढील प्रश्नात दोन विधाने दिलेली आहेत. त्या दोन विधानावरून दोन निष्कर्ष काढलेले आहेत. दिलेली विधाने आपल्या नेहमीच्या माहितीपेक्षा अगदी वेगळी आहेत. विधानात जी माहिती दिलेली आहे. ती खरी समजून योग्य पर्यायी उत्तर निवडा.
विधान: i) सर्व दिवे खांब आहेत ii) सर्व खांब दार आहेत.
निष्कर्ष : अ) कोणतेही दर दिवे नाहीत. ब) काही खांब दिवे आहेत.
अ) फक्त अ बरोबर ब) फक्त ब बरोबर
क) अ आणि ब बरोबर द) अ किंवा ब यापैकी कोणतेही बरोबर नाही
४१. खालील प्रश्नात काही संख्या दिल्या आहेत. त्यापैकी एक संख्या सोडून इतर संख्यांचा एक गट होऊ शकतो. दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळख.
९००, ९०००, ४००, ४०,००० , १६,०० , १०,०००
अ) १६०० ब) १०,००० क) ९००० द) ४००
४२. सौरभला त्याचे व त्याच्या बहिणीचे वय विचारले असता तो म्हणाला, तीन वर्षापूर्वी मी बहिणीच्या सातपट मोठा होतो, दोन वर्षापूर्वी चारपट मोठा, गतवर्षी तीन पट मोठा आणि यावर्षी अडीचपट मोठा आहे तर सौरभचे व त्याच्या बहिणीचे अनुक्रमे वय किती?
अ) ४, १० ब) १५, ६ क) २०, ८ द) १०,४
४६. खालील मालिकेत न जुळणारा अक्षर गट कोणता? COLD, BOLD, FOLD, SEND, SOLD
a) SOLD b) SEND c) BOLD d)COLD
४७. मेंढ्या आणि मेंढ पालांच्या एका गटामध्ये एकून पायांची संख्या हि डोक्यांच्या संख्येच्या दुप्पटी पेक्षा १६ ने अधिक आहे. तर गटात मेंध्याची संख्या किती?
अ) ६ ब) ८ क) २२ द) ३५
४८. एका कुटुंबात x चा y शी जो संबंध आहे तोच y चा x शी आहे, तर x आणि y हे ............आहे.
अ) पती व पत्नी ब) बहिण व बहिण क) भाऊ व बहिण द) आई व मुलगा
४९. अ) शंतनू व सीमा हि बहिण भावंडे आहेत.
ब) शंतनू एक भाऊ व तीन बहिणी आहेत.
यावरून पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे.
अ) या कुटुंबात चार बहिण भावंडे आहेत.
ब) सिमला तीन बहिणी आहेत.
क) सिमाला एक भाऊ व दोन बहिणी आहेत.
द) सीमाच्या बहिणीला दोन भाऊ व दोन बहिणी आहेत.
५०. नव्वद मधून नऊ किती वेळा वजा करता येतील?
अ) ० ब) १ क) ९ द) १०
51. The feminine of 'Horse'is
a) Bitch b) Sow c) Ewe d)
Mare
52. Pick out the sentence where the underlined word has been used as a noun
a) With his name the mother
still the babes.
b)
Still water runs deep.
c) Her sobs could be heard in the
still of night.
d) He is
still in business.
53. Soon father's anger melted.......love.
a) in b) into c) with d) by
54. Who gave you this pen? ( Change the voice)
a) by whom you were given this pen? b) by whom were you given this pen?
c) whom were you given this pen? d) None
55. Choose the correct sentence from the following..
a) He was given a reward by the king. b) He was rewarded the king by him.
c) The king rewarded to him. d) He was rewarded to king.
56. Combine the following sentences into simple sentence
He had many faults. But he was a good man at heart
a) Though he had many faults, he was a good man at heart.
b) Inspite of having many faults, he was a good man at heart.
c) As he was a good man at heart, he had many faults
d) While he had many faults, he was a good man at heart.
57. Kashi is ............ holy place.
a) a b) an c) the d) no article
58. Choose the word which is nearest in meaning to the word 'absurd'
a) wrong b) accurate c) adequate d) inconsistent
59. Find out the correct antonym of 'ZEAL'
a) apathy b) disinterest c) carelessness d) hatred
60. Find out the correct antonym of ' GUILTY'
a) Pure b) innocent c) Virtuous d) Argelic
61. Choose the word which will substitute the bold word group of words;
' Those who pas through this gate without permission will be prosecuted.'
a) buypasser b) absconders c) throughfares d) trespassers
62. Choose the correct word for the phrase 'one who can speak many languages'
a) A linguist b) a multilingual c) a polyglot d) a phonetician
63. Choose the correct alternative: ‘Franchise’ means
a) French goods b) study of the French language
c) the right to vote at elections d) foreign goods
64. Choose the correct one word substitution for the phrase
A person who has no money to pay off his debts
a) Pauper b) beggar c) insolvent d) debtor
65.’Now I have turned over a new leaf’. By this speaker means that
a) he has purchased a new diary.
b) he has stopped reading books.
c) he has changed for the better.
d) he has no more hope.
66. Find correct meaning of : By hook or crook
a) by any means b) by old ways c) by even ways d) None
67. Choose the correct meaning of the given idiom and phrase: Apple of ones eye.
a) top most officer b) very dear person c) useful person d) most important
68. Select the correct spelling from the following
a) Humorous b) Hummorus c) Humorus d) Hunrous
69. Select the correct spelling from the following
a) Sovereighn b) sovereign c) sovereign d) sovereign
70. Choose the correct Antonyms for the word “ Vagur”
a) simple b) difficult c) definite d) factual
71. Choose the correct Antonyms for the word “ Credible”
a) believable b) Unbelievable c) Notorious d) Stranger
72. Please find out the group which contains error.
One should take care of his health no error
a) b) c) d)
73. I didn’t hear some one in the room no error.
a) b) c) d)
74. Choose the correct meaning “ Bread and butter”
a) bag and baggage b) livelihood c) hush money d) breakfast
75. Fill in the blanks: …………he is poor, he is honest.
a) Though b) If c) Since d) None
७६. योग्य पर्याय नवदा “दिग्विजय”
अ) दि + विजय ब) दीक + विजय क) दिम + विजय द) दिग्वि + जय
७७. ‘सोने’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
अ) सोन्या ब) सोन क) सोने द) सोनी
७८. ‘झाडे’ या शब्दाचे मुळरूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ?
अ) पुल्लिंग ब) स्त्रीलिंग क) नपुसकलिंग द) उभयलिंग
७९. खालील वाक्यातील सामान्यरूप ओळखा.
‘जुईच्या वेलीला सुंदर फुल आले आहे’
अ) सुंदर ब) वेलीला क) जुईच्या द) फुल
८०. ‘आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल' अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
अ) प्रथम पुरुषवाचक ब) द्वितीय पुरुषवाचक क) तृतीय पुरुषवाचक द) आत्मवाचक
८१. 'पिकलेले फल खाली पडले' वाक्यातील विशेषण ओळखा.
अ) पिकलेले ब) फल क) खाली द) पडले
८२. 'वर जोराने वाहत होता' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात खाली दिलेल्यापैकी कोणती ते सांगा.
अ) उभयान्वयी ब) केवलप्रयोगी क) क्रियाविशेषण द) यापैकी नाही.
८३. लेखन दृष्टया शुद्ध शब्द निवडा.
अ) वांगमय ब) वोंगमय क) वाड:मय द) वांग्मय
८४. खालीलपैकी कोणत्या शब्दातील 'डा' अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही
अ) थेरडा ब) खोटारडा क) आखाडा द) घाणेरडा
८५. स्वतः शीच केलेल्या भाषणाला म्हणतात.
अ) संवभाषण ब) संभाषण क) चिंतन द) स्वगत
८६. जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा
अ) निरक्षर ब) अशिक्षित क) सनातनी द) आज्ञाधारक
८७. भिन्न शब्द ओळखा 'नेत्र'
अ) चक्षु ब) अक्ष क) पावक द) लोचन
८८. दिलेल्या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा ' मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे"
अ) सिंहावलोकन ब) पश्चिमा भिमुखन क) अधावलोकन द) पुच्छवलोकन
८९. भरवश्याच्या म्हशीला टोणगा
अ) सगळेच मुसळ केरात ब) खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा
क) केलेले सर्व पर्यन्त फुकट जाने द) स्वकीयांकडून घात होणे.
९०. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
अ) लवकर लग्न करणे ब) कमी खर्चात लग्न करणे
क) थोड्याशा यशाने हुरळून जाने द) खूप आनंद होणे
९१. " पत्रकार" या शब्दांचा विरुध्लिंगी पर्याय निवडा.
अ) पत्र कर्ती ब) पत्र करीन क) पत्र कारिणी द) पत्रिका
९२. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे
वरील पद्य पंक्तीत कोणता अलंकार आहे.
अ) उपमा ब) अनुप्रास क) यमक द) अतिशयोक्ती
९३. शेतक-यांना मिळणारे कर्ज
अ) मदत ब) सवलत क) अनुदान द) तगाई
९४. शेतक-यांचे आसूड ह्या ग्रंथाचे लेखक........आहेत.
अ) म. ज्योतिबा फुले ब) सावित्रीबाई फुले क) लोकमान्य टिळक द) न्यायमूर्ती रानडे
९५. नव-या मुलांची आई............
अ) सासू ब) वरमाय क) करवरी द) विहीण
९६. 'मनाचे श्लोक ' हा ग्रंथ ........... यांनी लिहिला आहे.
अ) रामदास स्वामी ब) संत तुकाराम क) संत नामदेव द) यापैकी नाही
९७. " हे बंध रेशमाचे" हे नाटक ............ यांनी लिहिले आहे.
अ) वसंत सबनीस ब) रणजीत देसाई क) राम गणेश गडकरी द) अनंत काणेकर
९८. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
अ) प्रात:काल ब) प्राता:काल क) प्रातर्काल द) प्रत्स्काल
९९. विरुधार्थ नसलेली जोडी ओळखा.
अ) तुटणे - जुळणे ब) सुस्त - धांदरट क) एवढे - तेवढे द) पगारी - बिनपगारी
१००. दिलेल्या शब्दापैकी पृथ्वी चा समानार्थी शब्द कोणता
अ) वसुंधरा ब) पृथक क) वृत्त द) आकाश
समाप्त